‘फिल्म इंडस्ट्री गटार आहे, प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं नसतं’; राज कुंद्रा प्रकरणात कंगना राणौतची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ बनवणे आणि अपलोड करणे या गुन्ह्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. राजच्या अटकेनंतर अनेकांनी पुढे येत यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता बाॅलिवूडची ‘क्विन’ कंगना रणौतने यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कंगनानं आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. कंगना पोस्ट शेअर करत म्हणाली की, “याच कारणामुळे मी फिल्म इंडस्ट्रीला गटार बोलते. प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं नसतं. मी माझा आगामी प्रोजेक्ट ‘टीकू वेड्स शेरु’च्या माध्यमातून बॉलिवूडचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे, आपल्याला मनोरंजन विश्वात एक मजबूत मूल्य प्रणालीची गरज आहे.”

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं या प्रकरणाचा साडेपाच महिने कसून तपास केला, अनेकांची चौकशी केली, त्यानंतर एकेक गोष्टींचा तपास केला. त्यातून या सगळ्याचा मास्टर माईंड हा राज कुंद्रा असल्याचं समोर आलं. मंगळवारी राज कुंद्राला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी राज कुंद्रा आणि त्याच्या आणखी एका साथीदाराला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा