मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज अंतिम निकाल, सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष

मुंबई : गेले अनेक वर्षे मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा अशा आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणास मंजुरी दिली होती. मात्र, यानंतर विरोध करत याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज (५ मे) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षण वैध ठरवण्याबाबत अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी १०.३० वाजता सुनावणी सुरु होईल. सर्वोच्च न्यायालयाने २६ मार्चला निकाल राखून ठेवला होता. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली होती.

मराठा आरक्षणाच्या बाजूनेच हा निकाल लागेल याबाबत आपण पूर्ण आशावादी आहोत, असं मत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मांडलं आहे. सर्व संविधानिक प्रक्रिया पूर्ण करुनही याबाबतच्या सर्व बाबी पूर्ण झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात चांगले आणि निष्णात वकिलांनी युक्तीवाद केला आहे. मराठा आरक्षण हे कसं योग्य आहे, ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देणं हे कसं बरोबर आहे, या सर्व मुद्द्यांमध्ये कुठलीही उणीव राहिलेली नाही, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.