हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊंनी आपल्या शेतात करावा; राजू शेट्टींचं टीकास्त्र

मुंबई : माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये खोत यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिलीय.

यावेळी राजू शेट्टी यांनी आज पुण्यात साखर आयुक्तांची भेट घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी एक रक्कमी एफआरपी द्यावी, डिसेंबर मध्ये तीन हजार तीनशे आणि राहिलेली रक्कम जानेवारी पर्यंत द्यावी. ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

शेट्टी म्हणाले की, हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊंनी आपल्या शेतात करावा, असा टोला राजू शेट्टी यांनी सदाभाऊंच्या पत्रावरून लगावला आहे. राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्याविषयी अधिक भाष्य करायचं टाळत, मी त्या माणसावर जास्त बोलणार नाही. मी महाविकास आघाडीवर नाराज आणि भाजपवर खूश असं काही नाही. माझी वाटचाल ही अशीच सुरू राहणार जो आडवा येईल त्याला तुडवायचा असं धोरण आपलं कायम असणार आहे, असं शेट्टींनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा