‘बिग बाॅस 15’ च्या घराची पहिली झलक सबसे अलग!

मुंबई : छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘बिग बॉस 15’ आता लवकरच भेटीला येत आहे. ‘बिग बाॅस 15’ घराची पहिली झलक समोर आली आहे. यावेळी मात्र हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळणार आहे. त्यांनतर सहा आठवड्यांनंतर हा कार्यक्रम टीव्हीवरून प्रसारित होणार असल्याचंही निर्मात्यांनी सांगितलं आहे.

शोच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत ‘बिग बाॅस 15’ च्या घराची पहिली झलक सगळ्यांना दाखवली आहे. आत्ता फक्त काही दिवसांची प्रतीक्षा आहे. आम्ही आरतीचं ताट घेऊन तयार आहोत, असं कॅप्शन टाकत बिग बाॅसच्या घराचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

यावर्षी नेहमीप्रमाणं सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना सलमान खान दिसणार नाही. मात्र त्याच्याऐवजी करण जोहर ही जबाबदारी पार पडणार असल्याचं समजतं आहे. बिग बाॅसचे नवीन घर, नवीन सीझन, नवीन, स्पर्धक, नवीन सूत्रसंचालक या सीझनची उत्सूकता वाढवत आहेत. हा शो टीव्हीवर प्रसारित होण्याच्या 6 आठवड्यांपूर्वी वूटवर प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा