समांथासोबतच्या घटस्फोटानंतर नागाचैतन्यने शेअर केली पहिली पोस्ट

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल अभिनेत्री समांथा आणि नागाचै यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या निर्णयानंतर नागा चैतन्यने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे.

नागा चैतन्यने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने एका तेलुगू चित्रपटाचे पोस्ट शेअर केले असून संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने चित्रपटाचे टायटल साँग शेअर केले आहे.

२००९ मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर समांथा व नागा चैतन्यची पहिली भेट झाली. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्यमध्ये चांगलीच मैत्री झाली.२०१५ मध्ये ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा हे दोघं पुन्हा भेटले तेव्हा शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं. ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या जवळपास ४ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे.

दरम्यान समांथा तिचा डिझायनर प्रीतम जुकलकरला डेट करत असल्याचे बोललं जात आहे. विभक्त होण्याच्या निर्णयानंतर प्रीतम आणि समांथामधील जवळीक ही समांथा आणि नागा चैतन्यच्या विभक्त होण्याचं कारण असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा