‘फुकट बिर्याणी’ प्रकरणातील ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

पुणे : पुणे पोलिसांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पोलिसांमध्ये खळबळ माजली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये पुणे पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचाऱ्याला जेवणाची ऑर्डर देताना हॉटेलवाल्याला बिलाचे पैसे देण्याची काय गरज आहे? अशी विचारणा करताना दिसत आहे. यावर याप्रकणात ज्या अधिकाऱ्यावर आरोप झालेत त्या आयपीएस प्रियंका नारनवरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे

“व्हायरल झालेल्या क्लीपची चौकशी झाली पाहिजे. माझ्या विरोधातील हे षडयंत्र दुसरं तिसरं कुणी नाही तर पुणे पोलीस दलातील एक डीसीपी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी केलाय,” असा दावाही प्रियंका नारनवरे यांनी केला आहे.

डीसीपींच्या कारभाराला वैतागलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहीत मॅडमच्या गैरकारभाराला आळा घालण्याची मागणी केली असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लीपबद्दल बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, “पुण्यातील महिला पोलीस उपायुक्तांची व्हायरल होणारी ती ऑडिओ क्लीप मी सुद्धा ऐकली. हा खूप गंभीर प्रकार आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत.”

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा