InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

तान्हाजी चित्रपटातील ‘शंकरा रे शंकरा’ हे पहिले गाणे प्रदर्शित

- Advertisement -

अंगावर काटा आणणारा ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहून या चित्रपटाविषयी उत्कंठा अजूनच वाढली आहे. अभिनेता अजय देवगण याची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील गाण्यांवाषियीही प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती. त्यांची उत्सुकता आता संपली असून या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले. ‘शंकरा रे शंकरा’असे या गाण्याचे बोल असून हे मेहुल व्यास यांनी गायिले आहे. या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी केले आहे.अनिल वर्मा यांनी हे गाणे लिहिले असून मेहुल व्यास यांनीच गायकाची आणि संगीतकाराची धुरा सांभाळली आहे. ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती अजय देवगण, भूषण कुमार, कृष्णन कुमार यांनी बजावली आहे.

- Advertisement -

Loading...

गणेश आचार्य यांनी आजपर्यंत अशा अनेक ऐतिहासिक चित्रपटातील गाण्यांच्या नृत्यदिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. मल्हारी, ततड ततड, खलीबली ही त्यामधली काही निवडक गाणी आहेत.तान्हाजी चित्रपटातील या गाण्यामध्ये मोठ्या संख्येने बॅक डान्सर्सही दिसतील. तसेच डान्सशी 36 चा आकडा असलेला अभिनेता अजय देवगण कडून या गाण्यामध्ये गणेश आचार्यने चांगलेच नाचवून घेतले असे दिसतेय. तसेच या गाण्यातील स्टेप्स पाहून यातील काही स्टेप्स सिग्नेचर स्टेप्स बनतील असंच दिसतय.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.