राज्यातील पहिला मतदार गुजरातचा रहिवासी; निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेली निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शांत झाल्याचे दिसत आहे. सोमवारी (21 ऑक्टोबर ) राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे.

राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील आहे. मात्र, या मतदाराचे नाव महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्याच्या मतदार यादीत असल्याने निवडणूक यंत्रणेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. निवडणूक आयोगाकडून मतदान प्रक्रियेची सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. तर, 24 ऑक्टोबर रोजी मतदानाचा निकाल येणार असून, त्यावर राज्यात कोणाचे सरकार असणार हे ठरणार आहे.

राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदार असलेला राजेश तडवी हा अक्कलकुवा तालुक्यातील मनिबेली गावात आपल्या नातेवाईकांकडे राहत होता. काही दिवसांपूर्वी तो त्याच्या मूळ गावी गुजरात राज्यात राहण्यासाठी गेल्याने त्याचे नाव गुजरातमधील मतदार यादीत आहे. आणि महाराष्ट्रातील मतदार यादीतही आहे.

Loading...

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.