मातोश्रीबाहेर धक्काबुक्की झालेल्या शेतकऱ्याच्या पदरी निराशाच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी शेतकरी महेंद्र देशमुख यांना धक्काबुक्की झाली होती. या शेतकऱ्याला शेतीकर्जाविषयी व्यथा असल्याने तहसिलदार व बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी न्याय न दिल्याचे सांगत आज या शेतकऱ्याने पनवेल तहसील कार्यालयासमोर कुटुंबासमवेत उपोषण करण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक पोलीस व प्रशासनाने देशमुख यांना उपोषण करू दिले नाही.

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल, भाजीपाल्याचे दर घसरले

त्यांनतर तहसीलदारांनी बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना तहसील कार्यालयात याबाबत चर्चेसाठी बोलावून घेतले. परंतु या बैठकीत शेतकऱ्याला समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तहसीलदार यांनी शेतकरी व बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना कृषी मंत्र्यांकडे बैठकीसाठी मुंबई येथे नेले.

Loading...

नुकताच शेतकऱ्याशी याबाबत संपर्क साधला असता त्याठिकाणीही न्याय मिळाला नसून केवळ आपण याविषयी चौकशी करू असे उत्तर मिळाले असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. त्यामुळे आता या शेतकऱ्याचा प्रश्न अधिकच ऐरणीवर आला आहे..

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.