InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

गोवा सरकारचा आज होणार मंत्रिमंडळ विस्तार

गोवा सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. दुपारी 3 वाजेदरम्यान राजभवनात शपथविधी सोहळा होणार आहे. सत्ताधारी भाजपमध्ये आलेल्या काँग्रेसच्या तीन असंतुष्ठ आमदारांसोबतच 4 आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जीएफपीच्या तीन आमदारांना आणि अपक्ष आमदार रोहन खुंडे यांना कॅबिनेट पदावरुन राजीनामा देण्यास सांगितले आहे.

सूत्रांनुसार, विद्यमान डिप्टी स्पीकर माइकल लोबो, चंद्रकांत कवलेकर, बाबूश मोन्सेरात आणि फिलिप नेरी रॉड्रिग्स यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल. चंद्रकांत कवलेकर यांना उपमुख्यमंत्री बनवले जाऊ शकते. तर गोवा फॉरवर्ड पार्टीच्या सर्व तीन मंत्र्यांना आणि अपक्ष आमदार आणि राजस्व मंत्री रोहन खुंटे यांना मंत्रिमंडळातून हटवले जाणार आहे. जीएफपीच्या तीन मंत्र्यांमध्ये त्याचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, विनोद पालेकर आणि जयेश सालगांवकर यांचा समावेश आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.