सरकारने सूडबुद्धीने कारवाई केली ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर मोठा आरोप

सविनय कायदेभंग आंदोलनादरम्यान प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह चारही मनसैनिकांची आज कल्याण रेल्वे कोर्टाने जामिनावर सुटका केली. प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या बॉण्डवर ही सुटका करण्यात आली असून न्यायालयातून बाहेर आल्यावर संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ डागली.

या आंदोलनादरम्यान सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली असून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न सरकार यातून करत आहे. मात्र सरकारच्या अशा कोणत्याही धाकदपटशहाला आम्ही बळी पडणार नाही, मनसैनिक त्याला अजिबात घाबरणार नाही.

आम्ही जे केलं ते लोकांसाठी केलं आहे.  तसेच सरकार डोक्यावर बंदूक ठेवून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही सामान्य जनतेसाठी भांडत असून सरकारला याप्रकरणी निर्णय घ्यावाच आहे.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.