राज्यपालांनी राज्य शासनास योग्य निर्देश द्यावेत ; प्रवीण दरेंकरांची मागणी

‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलनानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहित राज्य शासनास योग्य निर्देश द्यावेत, अशी विनंती केली आहे.

प्रवीण दरेकर यांना विरोधीपक्षनेतेपद दिल्याने भाजपमध्ये अंतर्गत नाराजी वाढणार ?

‘राज्य सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना आतापर्यंत 25 पत्र लिहिली आहेत. मात्र एकाही पत्रावर अमलबजावणी झाल्याचं दिसलं नाही, त्यामुळे आता राज्यपालांनी राज्य शासनास योग्य निर्देश द्यावेत,’ अस दरेकर यांनी पत्रात लिहिले आहे.

Loading...

युती व्हावी ही माझी मनापासून इच्छा आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पत्रात त्यांनी असे म्हंटले आहे की, मुख्यमंत्र्यांना आतापर्यंत लिहिलेल्या पत्रात शेतकऱ्यांना मदत म्हणून पॅकेज जाहीर करण्याबाबत, शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणेबाबत, मुंबईमधील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स, परिचारिकांना पीपीई कीटस्/N-95 मास्क देणेबाबत, दैनंदिन मजुरीवर आयुष्य असलेल्या बलुतेदार बांधवांना पुढील ४ महिने आर्थिक मदत देणेबाबत, पोलिसांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांविरुध्द देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याबाबत, रेशन व्यवस्थांमधील काळाबाजार थांबविणेबाबत, राज्याअंतर्गत प्रवशांना घरी जाण्यासाठी मोफत बस व्यवस्था करणेबाबत, अशा अनेक विषयांमध्ये सुधारणा करण्याचे आवाहन केले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.