राज्यपालांना अभिभाषण पूर्ण करू द्यायला हवं होतं; एकनाथ खडसेंनी व्यक्त केली खंत

जळगाव : आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झालीय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या अभिभाषणाला सुरवात केली तेव्हा सभागृहात सत्ताधारी सदस्यांनी राज्यपालांचा निषेध केला. “शिवाजी महाराज की’ अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. राज्यपालांना राष्ट्रगीतासाठी दोन वेळेस माईकवरून आमदारांना विनंती केली.

यानंतर राष्ट्रगीतानंतर त्यांनी अभिभाषणास सुरवात केली. तेव्हा पुन्हा घोषणाबाजी सुरु झाली. कोश्यारी यांनी दोन वाक्य पूर्ण करुन आपले भाषण संपवलं. ते फाईल बंद करुन राजभवनाच्या दिशेला निघून गेले. अवघ्या 22 सेकंदात राज्यपालांनी आपले भाषण आवरत पटलावर ठेवले. त्यामुळे सभागृहातील उपस्थित अचंबित झाले. सत्ताधारी पक्षाने ‘राज्यपाल हटाव’ अशा घोषणा यावेळी दिल्या.

यावर आता राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज्यपाल आपले अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेल्याची घटना पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात घडली आहे. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी अर्वाच्य घोषणा दिल्याची बातमी समोर आली. मात्र माझ्या मते दोन्ही बाजूंनी घोषणा- प्रतिघोषणा झाल्या. या गदारोळामुळे राज्यपालांना अभिभाषण अर्धवट सोडावे लागले. राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर जे काही राजकारण करायचे होते ते करता आले असते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना फटकारले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या