“मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने 5-6 मुलांना जन्म द्यावा”

मथूरा : उत्तर प्रदेशच्या मथूरा गाजियाबाद येथे महंत नरसिंहानंद यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. कोरोना महामारी हे सरकारचं षडयंत्र आहे. मास्क लावून लोकांना आजारी पाडलं जातंय असा दावा नरसिंहानंद यांनी केला आहे. मी ना मास्क लावणार ना कोरोना आहे असं मानणार असं अजब वक्तव्य त्यांनी केले आहे. इतकचं नाही तर भारतात मुस्लिमांची वाढती संख्या हिंदूंच्या विनाशाचं कारण बनणार असल्याचा वादग्रस्त दावाही त्यांनी केला.

कोरोना महामारी हे सरकारचं षडयंत्र आहे. मास्क लावून लोकांना आजारी पाडलं जातंय. त्यामुळे मी ना मास्क लावणार ना कोरोना आहे असं मानणार. तसेच ज्यांची इम्युनिटी क्षमता कमी आहे. ते लोक मास्क लावतात, असं महंत नरसिंहानंद यांनी म्हटलं आहे.

मला माझ्या इम्युनिटीवर विश्वास आहे. मी कोरोनाला मानत नाही. ज्यांची इच्छाशक्ती कमी अथवा कमकुवत आहे किंवा ज्यांच्या कुटुंबातील लोक त्यांच्यासोबत नाहीत तेच लोक कोरोनामुळे मृत्यू पावत आहेत. माझे सर्व माझ्या सोबत आहे, असंही नरसिंहानंद म्हणाले. तसेच भारतात मुस्लिमांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. ज्याठिकाणी मुस्लिमांची संख्या वाढली आहे त्याठिकाणी ते इतरांना जिवंत सोडत नाहीत. हिंदू नेत्यांवर भरवसा ठेऊ नका, असंही त्यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा