गेस्ट हाऊसची इमारत कोसळली; इमारतीखाली ३० ते ३५ भारतीय जवान दबल्याची भीती

हिमाचल प्रदेशमधील सोलन भागात कुमारहट्टी-नाहन महामार्गाजवळ असलेल्या सेहज ढाबा आणि गेस्ट हाऊसची इमारत कोसळली आहे. या इमारतीखाली ३० ते ३५ भारतीय जवान दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय जवान येथून जात असताना जेवण करण्यासाठी थांबल्यावर ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

महामार्गाजवळ असलेल्या सेहज ढाबा आणि गेस्ट हाऊसची इमारत मुसळधार पावसाने कोसळल्याची शक्यता आहे. प्रशासनाला माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्याला सुरूवात झाली आहे.

Loading...

अधिक माहिती प्रतीक्षेत

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.