टास्क फोर्सच्या प्रमुख डॉ. शाहिद जमीलांचा राजीनामा; म्हणाले मोदी सरकारवर ऐकत नाही

भारतात कोरोनाविरोधातील लढा सुरु असतानाच केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे. ज्येष्ठ विषाणूशास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी जीनोम सर्विलान्स प्रोजेक्ट ग्रुपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. केंद्र सरकारवरच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत विषाणूशास्त्रज्ञ शाहिद जमील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. डॉ. शाहिद जमील सध्या अशोका विद्यापीठात त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सचे संचालक आहेत.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, कोरोनाविरोधातील सरकारच्या धोरण आणि तयारीवर ते समाधानी नव्हते. मागील काही दिवसांपासून जमील यांनी उघडपणे सरकारवर निशानाही साधला होता. गेल्या आठवड्यात शाहिद जमील यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये भारतातील कोरोना स्थितीवपर एक लेख लिहिला होता, ज्यात त्यांनी सरकारच्या तयारीवर टीका करत वैज्ञानिकांचा सल्ला ऐकत नसल्याचा आरोप केला होता.

“केंद्र सरकारने वैज्ञानिकाचं म्हणणं ऐकावं आणि धोरण बनवण्यासाठी आपली हट्टी वृत्ती सोडावी,” असा सल्ला जमील यांनी आपल्या लेखात दिला होता. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यानंतर केंद्र सरकारने डिसेंबर 2020 मध्ये या सल्लागार ग्रुपची स्थापना केली होती.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा