InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

विनाहेल्मेट मुळे अपघातात सर्वाधिक प्रमाण

- Advertisement -

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक  बुधवारी (दि. ३१) मुंबईत झाली़. या बैठकीत ही माहिती देण्यात आली़ आहे. देशातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी बुधवारी संसदेने मोटार वाहन कायद्यातील तरतुदीत दुरुस्ती करणारे विधेयक मंजूर केले आहे.

त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत राज्यातील वाढत्या अपघाताबाबत चर्चा करण्यात आलेली आहे.दरम्यान   शहरात जानेवारी ते जुलै अखेर झालेल्या अपघातात हेल्मेट परिधान न केलेल्या ४७ जणांना अपघाती मृत्यु झाला आहे़ त्यात ३६ जण चालक होते तर ११ जण सहप्रवासी होते़ तर, हेल्मेटधारक ६ जण मृत्युमुखी पडले आहेत.

- Advertisement -

तसेच विना हेल्मेट १३४ गंभीर जखमी झाले आहेत. त्यात ९९ वाहनचालक असून ३ सहप्रवासी आहेत़. हेल्मेटधारक तिघे गंभीर जखमी झाले आहेत़.  जुलै अखेर प्राणघातक अपघातात ५९ जणांचा मृत्यु झाला़. अतिवेगामुळे झालेल्या अपघातात ५३ जणांचा मृत्यु झाला असून ११५ जण गंभीर जखमी झाले असल्याच  पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम, यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.