अयोध्येतील राम आणि लक्ष्मणाच्या मूर्तीला मिश्या असाव्यात ; भिडे गुरुजींची मागणी

‘कोरोनाला न घाबरता राम मंदिर भूमिपूजन सोहळा तमाम हिंदू समाजाने दिवाळी-दसऱ्या प्रमाणे साजरा करावा’ असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले आहे. तसंच, ‘मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या राम लक्ष्मणच्या मूर्त्यांना मिश्या असाव्यात, अशी विनंतीही भिडे यांनी केली आहे.

गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची बोटचेपी भूमिका का? भाजपचा थेट सवाल

5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिर भूमी पूजन सोहळ्याबाबत आज सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दूध आंदोलन पेटलं ; स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला

‘शिवसैनिकांनी ऑनलाइन भूमिपूजन करण्याची केलेली मागणी बाळासाहेब ठाकरे यांना आवडली नसती. उद्धव ठाकरे यांना जरी अयोध्येत भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण नसले तरीही त्यांनी तिथे गेले पाहिजे. कारण की, त्यांना कोणत्याही नियंत्रणाची गरज नाही’ असं मतही भिडेंनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.