भारताच्या या गोलंदाजाने सुर्यकुमार यादवची तुलना केली एबी डिव्हिलियर्ससोबत

मुंबई : आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने केलेल्या कामगिरी सगळीकडेच कौतूक होत आहे. सर्व मोठ्या खेळाडूंकडे सूर्यकुमारचे कौतूक होत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता भारतीय स्पिनर हरभजन  सिंग एका कार्यक्रमात बोलताना दक्षिण अफ्रिकेचा सुपरस्टार क्रिकेटपटू आणि आयपीएल मध्ये आरसीबी संघातून खेळणार एबी डिव्हिलियर्ससोबत सूर्यकुमारची तुलना केली आहे.

हरभजन म्हणाला की “सूर्यकुमार यादवचे गेम चेंजरपासून ते सामन्याचे विजेते म्हणून रूपांतर झाले आहे यात काही शंका नाही. त्याने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीची जबाबदारी स्वीकारली आहे. आणि असं ही नाही की तो १०० च्या स्ट्राइक रेटने खेळतो. तर तो पहिल्याच बॉलपासून आक्रमक फलंदाजी करण्यास सुरवात करतो. ”

सूर्यकुमार यादवला फलंदाजी करताना रोखणे खुपच अवघड आहे कारण तो चारही दिशांना शॉट मारतो. यामुळे तो भारताचा एबी डिव्हिलियर्स आहे. आश्याप्रकारे हरभजनने सुर्यकुमारची तुलना एबी डिव्हिलियर्ससोबत केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.