मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधान मोदींच्या हातात नाही, राज्यांच्या सूचीमध्ये आहे: चंद्रकांत पाटील

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणासाठी भाजपा सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं आहे.

चंद्रकांत पाटील यांना संभाजीराजेंनी, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळेला पत्र पाठवले. पण त्यांनी अद्याप मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही. हा प्रश्न विचारला असता. ते म्हणाले, संभाजीराजेंनी विविध विषयांवर जेव्हा पंतप्रधान मोदींची भेट मागितली असेल, तेव्हा ती त्यावेळी नक्कीच मिळाली असेल. मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधान मोदींच्या हातात नाही. हा विषय राज्यांच्या सूचीमध्ये आहे.” असे म्हणाले.

तसेच, “करोनाचा विचार करून वेगवेगळ्या स्वरूपात दहावी, बारावीची परीक्षा झालीच पाहिजे. सध्या हम करे सो कायदा असं सरकारचं धोरण आहे.” अशी टीका देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केली.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा