The Kerala Story | ठाणे: ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तर मध्यप्रदेशनंतर आता उत्तर प्रदेशमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचं वादग्रस्त विधान (Controversial statement of ‘this’ leader of NCP)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी या चित्रपटाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले,”खोटारडेपणाला देखील हद्द असते. एका धर्माला आणि राज्याला बदनाम केलं जात आहे. या चित्रपटाच्या निर्मात्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे. हा चित्रपट महिलांना बदनाम करायचं काम करत आहे”.
या चित्रपटाला बंदी आणि विरोध असूनही प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत 30% अधिक वाढ झालेली दिसली आहे. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने पहिल्या विकेंडला 35.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
मुस्लिम तरुण हिंदू मुलींना लव जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं धर्मांतर करतात आणि त्यांना अफगाणिस्तान, इराण, सिरिया या देशांमध्ये घेऊन जातात, असा उल्लेख या चित्रपटामध्ये करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | संजय राऊत कुठं गेले? शरद पवारांवरील टीकेनंतर राऊत बॅकफूटवर
- Chitra Wagh | चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंना सुनावले खडे बोल; मोठ्या नेत्या म्हणत लगावला टोला
- Sharad Pawar | पृथ्वीराज चव्हाणांचे काँग्रेसमध्ये स्थान काय? शरद पवारांनी चव्हाणांना सुनावलं
- Samana Editorial | गुजरातमधून 40 हजार मुली कुठे गायब झाल्या? सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपाला खडा सवाल
- Sharad Pawar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपचा आदेश मान्य करावाच लागतो; शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र