The Kerala Story | ‘द केरळ स्टोरीला’ विरोधकांकडून प्रचंड विरोध; तरीसुद्धा 3 दिवसांत जबरदस्त कमाई

The Kerala Story | मुंबई : सुदिप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी हा चित्रपट (The Kerala Story Movie) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.अनेक राज्यातून या चित्रपटाला प्रदर्शना आधीच विरोध करण्यात येत होता नुकताच हा चित्रपट 5 मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तर तो तिसऱ्या दिवशी देखील जोरदार कमाई करत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

‘द केरळ स्टोरी’ची तिसऱ्या दिवशीची कमाई

हा चित्रपट केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा प्रकारे धर्मपरिवर्तन करण्यात आलं आणि ISIS चे दहशतवादी बनवण्यात आलं, याची कथा या चित्रपटातुन दाखवण्यात आली आहे. यामुळे तमिळनाडूसह अनेक राज्यातुन या चित्रपटाला विरोध होत आहे. तर या चित्रपटाबाबत देखील अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तर या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी जवळपास 16.60 कोटी रुपये कमाई केली आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवार 8 कोटी रुपये, तर दुसऱ्या दिवशी शनिवार 6मे ला 11.22 कोटी रुपये कमावले. तसचं जर हा चित्रपट आजून काही काळ अशीच कमाई करत राहिला तर
काही दिवसांत 50 कोटींचा टप्पा सहज गाठू शकेल.

दरम्यान, ‘द केरळ स्टोरी’चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बेलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तर या चित्रपटाला विरोध झाल्यानंतर अदा शर्मानी ट्विट करत विरोधकांना चांगलंच सुनावलं देखील होत. ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी गुगलवर फक्त दोन शब्द सर्च करावेत. ISIS आणि ब्राइड्स हे दोन शब्द गुगलवर सर्च करा. तुम्हाला सत्य समोर दिसेल अशी माझी विनंती आहे. अशा शब्दात त्यांनी ट्विट केलं होतं. याचप्रमाणे अभिनेत्री कंगना रनौतने देखील आपली प्रतिक्रिया देत म्हटलं की, ‘या चित्रपटावर बंदी आणू शकत नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलंय. या चित्रपटात फक्त ISIS सोडून इतर कोणालाच चुकीचं दाखवलं नाही असं मला वाटतं. याचप्रमाणे फक्त मीच त्यांना दहशतवादी म्हणतेय असं नाही तर आपला देश, गृह मंत्रालय आणि इतर देशांनी सुद्धा त्यांना दहशतवादी म्हटलंय. जर तुम्हाला ती दहशतवादी संघटना वाटत नसेल तर तुम्हीदेखील दहशतवादी आहात’, असं कंगना म्हणाली. यामुळे हा चित्रपट अजूनही वादाच्या भोवऱ्यात असल्याचं पाहायला मिळतंय.

महत्वाच्या बातम्या –