InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात दिग्दर्शकासोबत घडला धक्कादायक प्रकार

- Advertisement -

ठाण्यात एका चित्रपट दिग्दर्शकासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका कार्यक्रमानिमित्त ठाण्यातल्या डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात गेलेल्या दिग्दर्शक विजू माने यांच्यासोबत लिफ्ट बंद झाल्यानं अर्ध्यातच अडकून पडण्याचा जीवघेणा प्रकार घडला. विजू माने या नाट्यगृहाच्या व्हिआयपी लिफ्ट मधून कार्यक्रम स्थळी जात असताना अचानक लिफ्ट बंद पडली आणि ते अर्ध्यावरच अडकले. त्यांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला पण त्यांना बाहेर पडता आले नाही. शेवटी नाट्यगृहाच्या सुरक्षाकर्मींच्या अथक प्रयत्नांनंतर विजू माने यांना लिफ्ट मधून सुखरुप बाहेर काढलं गेलं.

विजू माने यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट करत या बद्दलची माहिती दिली. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर लिहिलं, ‘डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह आणि दुरावस्था ही युती कधीच तुटणार नाही. आज माझ्यावरचा जीवघेणा प्रसंग टळला मात्र उद्याचं काही माहित नाही.’ डॉक्टर काशिनाथ नाट्यगृहाची  व्हिआयपी लिफ्ट मुळातच गेल्या अनेक महिन्यांपासून खराब आहे असा प्रकार अनेकदा घडलाय अशी माहिती तिथल्याच कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे नाट्यगृहात येणा-या एखाद्या व्हिआयपी किंवा सामान्य प्रेक्षकाचा जीव गेल्यावर ठाणे महानगर पालिका जागी होणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.खरं तर ठाण्यातील नाट्यगृहांवर ठाणे मनपा कोट्यावधी रुपये खर्च करते पण तरीही अशा घटना घडतात. त्यामुळे पालिका प्रशासन नाट्यगृहा बाबत किती गंभीर आहेत हे स्पष्ट होतं.

Loading...

- Advertisement -

Loading...

Dr. kashinath ghanekar नाट्यगृह आणि दुरावस्थाही युती कधीच तुटणार नाही.आज माझ्यावरचा जीवघेणा प्रसंग टळला. ऊद्याचं माहित नाही.

Viju Mane ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 1, 2019

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.