‘शिवसेनेला जो काही धडा शिकवायचा आहे तो….’; चंद्रकांत पाटलांचा इशारा

पुणे : राज्यात मान्सून दाखल झाला आणि राजधानी असलेल्या मुंबईची तुंबई झाली. मुसळधार पावसामुळे मुंबईत झालेल्या तुंबईमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

“गेली 20 वर्षांहून अधिक कालावधी मुंबई मनपात शिवसेनेची सत्ता आहे. दीड वर्ष झाले राज्यातही सत्ता आहे. 40 हजार कोटींचं बजेट असतं. 58 हजार कोटींच्या एफडी आहेत पण मुंबईकर पूर्णपणे असुरक्षित आहेत. कितीजण मुंबईतील पावसात मॅनहोलमध्ये पडतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईकर जो काही धडा शिकवायचा आहेत ते शिवसेनेला शिकवतील,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22व्या वर्धापन दिनावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावर आपण टिप्पणी करणं योग्य नाही.”

“संजय राऊत यांनी मला मनाविरुद्ध का होईना शुभेच्छा दिल्या आहेत. सामनात आठवड्यातील सात दिवसांपैकी एक अग्रलेख माझ्यावर असतो. काल मी एका कार्यक्रमात असताना मला एक पुस्तक आणि एक वाघ दिला. तर मी म्हटलं फार चांगलं झालं वाघांशी तर आमची दोस्ती आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा