InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

घराणेशाहीचा मुकूट भाजप मस्तकी

- Advertisement -

घराणेशाहीवर हल्ला कऱणाऱ्या भारतीय जनता पक्षामध्येच सध्या घराणेशाही वाढत असल्याची चिन्हे दिसत आहे. घराणेशाहीचा मुकुट त्यांच्याही मस्तकावर असल्याचे त्यांच्याच पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांच्याही हे चांगलेच लक्षातही आले आहे.

भाजपामध्ये उत्तर प्रदेश आणि हरयाणा राज्यात दोन राजकीय कुटुंबे घराणेशाहीत आघाडीवर आहेत. या दोन कुटुंबातील प्रत्येकी तीन सदस्य सक्रिय राजकारणात असून त्यांच्या सरकारमध्ये आणि कायदेमंडळातील पदे आहेत. ज्या पक्षाने राजकारणातील घराणेशाहीला विरोध केला, तोच ती जोपासतो आहे.

- Advertisement -

या आधीच्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये चौधरी वीरेंद्र सिंह हे पोलाद मंत्री होते. त्यांनी स्वत:च पदाचा राजीनामा दिला होता. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते असून राज्यसभेचे सदस्य आहेत. वीरेंद्र सिंह हे सर छोटू राम यांच्या कुटुंबातील व छोटू राम यांचे नातू. छोटू राम यांच्या घराण्याचा जाटांवर असलेला प्रभाव हुडांना पराभूत करण्यासाठी व आपल्या फायद्यासाठी वापरण्याचा निर्णय भाजपाने घेतला. त्यासाठी वीरेंद्र सिंह हे उपयोगाचे ठरणार होते. भाजपाने वीरेंद्र सिंह यांच्या पत्नी प्रेमलता यांना जिंद विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आणि त्या निवडूनही आल्या. आता त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य कायदेमंडळात पदावर आहेत.

औतली विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले कल्याण सिंह यांचे नातू संदीप सिंह हे योगी आदित्यनाथ सरकारमध्ये मंत्री आहेत. अशा प्रकारे कल्याण सिंह यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.