“मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांना विरोध नाही, पण आम्ही काय भिकारी आहोत का?”

मुंबई : “मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांना विरोध नाही. पण आम्ही अजूनही हातात बांगड्या घातलेल्या नाहीत. आम्ही काय भिकारी आहोत का?, आम्ही जे संविधानात्मक आहे जे भारतीय राज्यघटनेने दिलं आहे, तेच आम्ही मागतो आहे, असा सवाल उर्जामंत्री नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे.

“मराठा समाजानेसुद्धा मोठेपणा दाखवून आम्हाला वेठीस धरू नये. आमचं भांडवल करून तेच फक्त काम करु शकतात, आम्ही करु शकत नाही, अशी भूमिका घेऊ नये,” असा इशारा नितीन राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आरक्षणावरून नितीन राऊत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपुर्वी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाचा रोष पाहता ठाकरे सरकारने पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे आता ठाकरे सरकारमध्येच वाद होताना दिसत आहेत. तर मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसी समाजही राज्यव्यापी मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा