‘शमशेरा’ चित्रपटात दिसणार मराठमोळी अभिनेत्री…

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा लवकरच ‘शमशेरा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रटात रणबीर कपूर पहिल्यांदाच डबल रोल करणार आहे. ज्यामध्ये तो पिता आणि मुलाची भूमिका साकारणार आहे. तसेच चित्रपटात अभिनेत्री वाणी कपूर देखील महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. आता या चित्रपटात आणखी एक मराठमोळी अभिनेत्री दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

ही मराठीमोळी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून इरावती हर्षे आहे. इरावतीने आत्ता पर्यंत मराठीसह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘शमशेर’ या चित्रपटात इरावती रणबीरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

हा चित्रपट १८व्या शतकातील दरोडेखोराच्या आयुष्यावर आधारित आहे. रणबीर कपूर या चित्रपटात दरोडेखोराची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता संजय दत्तदेखील चित्रपटात महत्त्वाची भूमिकेत दिसणार आहे. तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून पुढच्या वर्षी मार्चपर्यंत चित्रीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच चित्रपटातील वाणी आणि रणबीरची केमिस्ट्री पाहण्यासारखी असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.