InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

राज ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर काँग्रेस नेत्यांचा सूर बदलला

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोमवारी नवी दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर आता काँग्रेस नेत्यांनी आपली भाषा बदलली आहे. मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेस नेत्यांनी काहीशी सकारात्मक संकेत देण्यास सुरुवात केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यूपीएच्या अध्यक्षा असलेल्या सोनिया गांधींसोबतच भेट घेतल्यामुळे याकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाहिलं जातंय. विधानसभेसाठी राज्यात नवं समीकरण जुळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ही सदिच्छा भेट होती की यामध्ये काही राजकीय चर्चा झाली याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.