InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘मेट्रो’साठी एमएमआरडीएची पालिकेकडे धाव; १६ हजार कोटीची मागणी

- Advertisement -

मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने मुंबईत आखलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या खर्चाचा काही भाग महापालिकेने उचलावा व या खर्चापोटी दहा वर्षांत १६ हजार कोटी एमएमआरडीएला द्यावेत, अशी मागणी केली आली आहे.

महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी नगरविकास विभागांच्या सचिवांना पत्र लिहून पालिका आयुक्तांना तसे निर्देश द्यावेत अशी विनंती केली आहे. पालिकेचा महसूल आधीच कमी झालेला असताना एमएमआरडीने केलेल्या या मागणीमुळे पालिकेचे कंबरडे मोडले आहे.

- Advertisement -

पालिका प्रशासनाकडे तसे पत्र पाठवण्यात आले आहे. गेल्या वर्षी एमएमआरडीएने पालिकेकडे याच कारणास्तव सुमारे ८,६२९ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी हा निधी देण्यास पत्राद्वारे नकार दिला होता.

पालिकेचा महसूल विविध कारणांमुळे कमी झाला असून पालिकेचे आधीच अनेक मोठमोठे प्रकल्प सुरू असून त्याकरिता निधीची आवश्यकता आहे, असेही त्यांनी त्या पत्रात म्हटले होते. त्यामुळे या वर्षी महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी नगरविकास विभागाचे मुख्य सचिव नितीन करीर यांनाच पत्र लिहून पालिकेला तसे निर्देश देण्याची विनंती केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.