मोदी सरकारने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला, त्यांना इतिहास कधी माफ करणार नाही

सांगली : तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकरी २ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाला या आंदोलनाला हिंसक वळण आलेले देखील सगळ्यांनी पाहिले. पण त्यानंतरही शेतकरी बांधव शांतपणे पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत.

दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन सुरू असून बॉर्डर छावणीत रुपांतरीत करण्यात आले आहे. कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची सरकार चांगलीच कोंडी करत आहे. याचबरोबर देशभर ठीकठीकाणी आंदोलन केली जात आहेत.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज विविध संघटनाच्या वतीने देशातील विविध ठीकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. राजधानी दिल्लीला या आंदोलनातून वगळण्यात आलं असून, देशभरात तीन तास आंदोलन केलं जाणार आहे.

दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने विचारपूस करणे गरजेचे होते. पण तसे न करता त्यांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करून पाप केले आहे. हुकूमशाही पद्धतीने मोदी सरकारने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. त्यांना इतिहास कधी माफ करणार नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते तथा राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा