InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अखेर मान्सून मुंबईमध्ये दाखल झाला आहे.

राज्याच्या उर्वरित भागात पावसाची हजेरी

मुंबई : मुंबईकरांना आस लागून राहिलेला मान्सून अखेर मुंबईत दाखल झाला आहे. राज्यतील इतर भागांमध्ये मान्सून सक्रीय झाल्यानंतर मुंबईकरांना मात्र मान्सूनची प्रतिक्षा होती. पण, आता मुंबईकरांची मान्सूनची प्रतिक्षा संपली असून मुंबईत मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये मुंबईत जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पावसाअभावी सध्या मुंबईकर उकड्यानं देखील हैराण आहेत. शिवाय, पाणी कपातीचा देखील मुंबईकरांना सामना करावा लागणार आहे. पण, मान्सून मुंबईमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिल्यामुळे मुंबईकरांवरचं पाणी कपातीचं संकट देखील लवकरच टळण्याची शक्यता आहे. तसंच उकाड्यानं हैराण मुंबईकरांचे डोळे देखील पावसाकडे लागून राहिले आहेत. पण, आता लवकरच दिलासा मिळणार आहे. जूनचे तीन आठवडे हे कोरडेच गेले आहेत.

केरळमध्ये 7 जून रोजी दाखल झालेला मान्सून वायू चक्रीवादळामुळे राज्यात उशिरानं दाखल झाला. पण, मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसानं मात्र हजेरी लावली आहे. राज्यात भीषण दुष्काळ असून पावसामुळे अनेक भागांना दिलासा मिळाला आहे. मुंबईतील काही भागांमध्ये देखील पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply