InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सेवांना बाधा न पोहचता आंदोलन अद्यापही सुरूच

देशभरात सुरु असलेला डॉक्टरांचा संप आज सोमवारी पुन्हा सुरु राहणार आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आवाहनानंतर देशातील 5 लाख डॉक्टरांनीसंपात सहभाग घेतला आहे. दिल्ली मेडिकल असोसिएशनचे 18 हजार डॉक्टरही संपावर आहेत.

दिल्ली मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवांना बाधा न पोहचता संप करण्याचं आवाहन डॉक्टरांना केलं आहे.

दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी या संपात सहभाग न घेतल्याने एम्सच्या रुग्णसेवेवर परिणाम होणार नाही.

पश्चिम बंगालच्या संपकरी डॉक्टरांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र बंद दरवाजाआड कोणतीही चर्चा नको अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.