बहुप्रतिक्षित सिरीज ‘मुंबई डायरीज २६/११’ प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणारी वेबसिरिज ‘मुंबई डायरीज २६/११’चे प्रदर्शन सोहळा नुकताच ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ‘साहस को सलाम’ नावाने पार पडला आज.

हा कार्यक्रम राज्याचे पर्यावरण आणि शिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अमेझॉन इंडिया ओरिजिनलच्या प्रमुख अपर्णा पुरोहित, दिग्दर्शक निखिल अडवाणी, निर्माते आणि मालिकेतील कलाकार यांच्या सहउपस्थितीत साजरा करण्यात आला.

वेबसिरिज विषयी बोलताना, ‘अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि नायक यांना ही श्रद्धांजली आहेच, पण या मालिके त अष्टपैलू कलाकारांची फौज आहे. या कथा वेबमालिके तून जिवंत करण्यासाठी सगळ्या टीमने जीव ओतून काम के ले आहे. २६/११ सारख्या भयानक हल्ल्याला डॉक्टर, नर्सेस, इंटर्न आणि वॉर्डबॉय यांनी कशाप्रकारे तोंड दिले असेल, त्या भयंकर रात्री रुग्णालयात नेमके काय घडले असेल याचे चित्रण या वेबमालिके त करण्यात आले आहे,’ अशा शब्दांत निखिल अडवाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा