महाविकास आघाडीचा स्वभाव फक्त रडायचा, लढायचा नाही : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : ठाकरे सरकारला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठा दणका बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. मागील वर्षी महाराष्ट्राने ओबीसी आरक्षणासाठीचा इम्पिरिकल डाटा न दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले होते. यावर आता भाजप नेते आक्रमक झाले असून त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवलाय.
यानंतर माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे सरकार, अपयशी सरकार आहे. एकाही कामात यश मिळवू शकत नाहीये. मग ते कोरोनाचे संकट असेल, मराठा आरक्षण असेल नाही तर ओबीसींचे राजकीय आरक्षण… प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरत असलेले हे आघाडी सरकार आहे, असा घणाघाती हल्ला मुनगंटीवार यांनी केला.
तसेच पुढे मुनगंटीवार म्हणाले कि, ठाकरे सरकारचा स्वभाव फक्त रडायचा आहे, लढायचा नाही. यश मिळविणे यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही मुद्द्यावर हे सरकार गंभीर नाही. यांचा सर्व वेळ राजकारण करण्यात जातो. त्यामुळे ते काम केव्हा करणार, हा मोठा प्रश्न आहे, असा खोचक टोला माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हाणला.
तसेच पुढे हे सरकार कधी तक्रार करण्यासाठी, तर कधी टिका करण्यासाठी पत्रकार परिषदा घेतात. सकारात्मक बाबीसाठी या लोकांनी एकदा तरी पत्रकार परिषद घेतली का? असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्राची प्रगती व्हावी, जनतेला न्याय द्यावा, शेतकऱ्यांना न्याय द्यावा, यासाठी या सरकारने आजवर कधीच भाष्य केले नाही. यांचे भाष्य फक्त केंद्र सरकारने पैसे दिले नाहीत. याला कर्तृत्व म्हणावे का? असा सवालही त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट वादात; भाजपने केले अफरातफर झाल्याचे गंभीर आरोप
- आता ओबीसी मंत्री कुठे आहेत? हे सर्व पवारांच्या ताटाखालचे मांजर : गोपीचंद पडळकर
- माझी शिफारस कमी पडल्यानेच शिवेंद्रसिंहराजेंचे अध्यक्षपद हुकले ; शशीकांत शिंदेंचा टोला
- जिल्हा बँकेचे अध्यक्षपद हुकल्यावर शिवेंद्रराजेंची पहिलीच प्रतिक्रिया म्हणाले,…
- सरकार पण तुमचंच, सरकारला लुटू नका; अजित पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला