InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सुझुकीची दमदार बाईक हयाबुसाचे नवे मॉडेल लॉन्च

सुझुकी मोटारसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने त्यांची स्पोर्ट्स श्रेणीतील बाईक हयाबुसाची नवी आवृत्ती बाजारात आणली आहे. भारतीय परिस्थिती लक्षात घेऊन त्यामध्ये दोन बाजूचे साइड रिफ्लेक्टर ठेवले आहेत. बाईक दोन रंगात लॉन्च करण्यात आले आहे. एसएमआयपीएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सातोशी उचिदा यांनी सांगितले की, ‘हयाबुसाच्या नव्या आवृत्तीमधील रंग लोकांना आकर्षिक करणारे ठरणार आहेत.’

हयाबुसाची एक्स शोरुम किंमत १३ लाख ७४ हजार रुपये आहे. हयाबुसाच्या मागील आवृ्त्तीतील बाईकच्या तुलनेत या बाईकची किंमत १७ हजार रुपयांनी अधिक आहे. नव्या मॉडेलमध्ये १ हजार ३४० सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. तसेच या बाईकमध्ये १९७ क्षमतेचे बीएचपी देण्यात आली आहे. हयाबुसाची या स्पोर्ट्स बाईकला ०-१०० किमी/तास वेग पकडण्यासाठी केवळ २.७४ सेकंदांचा कालावधी लागणार आहे.सुझुकीने डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला या बाईकची बुकिंग सुरु केली होती. बाईकची बुकिंग १ लाख रुपयांना सुरू करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या –

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.