‘पुढची निवडणूक मोदी विरुद्ध भारत असेल’; ममता बॅनर्जी दिल्लीत कडाडल्या!

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेत जवळपास तासभर चर्चा केली. या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधीही तेथे उपस्थित होते.

या भेटीनंतर २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा असणार का?, हा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिलं. “मी काही राजकीय भविष्यवक्ता नाही. ते तेव्हाच्या स्थितीवर अवलंबून आहे. राजकारणात समीकरणं बदलत असतात. आता विरोधकांना एकत्र येणं गरजेचं आहे. २०२४ च्या निवडणुकीत आम्हाला आशा आहेत. पुढची निवडणूक मोदी विरुद्ध भारत असेल,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यातून भाजपा विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न आहे, असंही बोललं जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या मुखपत्रातही ‘एबार शपथ, चलो दिल्ली’ याबाबतची घोषणा देण्यात आली आहे. त्यामुळे हा दौरा आणि घोषणेकडे एका नजरेतून बघितलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा