एमआयएमची औलाद येते आणि औरंगजेबाच्या पाया पडते; राज ठाकरे संतापले

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे एमआयएमची सभा पार पडली. यावेळी या सभेला एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी उपस्थित होते. यावेळी अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावरून आता नवा वाद उद्भवला आहे. यावरुनच सध्या आरोपांचा कलगितुरा रंगला असून भाजपने हा मुद्दा उचलून धरला आहे.

तसेच या मुद्द्यावरून ओवैसींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर आज पुण्यात राज ठाकरे यांची सभा पार पडत आहे. या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचा लक्ष लागलं आहे.यावेळी राज ठाकरे यांनी वरील मुद्दावरून बोलताना यावर भाष्य केलं.

शिवसेनेच एमआयएमला औरंगाबाद मध्ये वाढवलं, मोठा केला. या निजामाच्या औलादी इकडे वळवळ करू लागल्या, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. शिवसेनेचा औरंगाबादचा खासदार पडला आणि एमआयएम चा निवडून आला. एमआयएमला भुसभुशीत जमीन शिवसेनेच दिली. आमच्याच महाराष्ट्रात निजामाची औलाद येते.

जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्याच्या मनसुब्याने निघाला अश्या औरंगजेबाच्या कबरीवर ते ओवेसी डोकं टेकवतात. मात्र सरकार काहीच कारवाई करत नाही. आम्हालाच लाज वाटत नाही. सत्ताधारीच असे बसले आहेत. आता आमच्या शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल, तर यापलीकडे काय बोलायचं? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा