“बिरोबाच्या बनात येऊन खोट्या शपथा घेणाऱ्याचं पार वाटोळं होतं”

सांगली : सांगली जिह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव भागातील टेंभू सिंचन योजनेच्या जल पूजन कार्यक्रम आरेवाडीमधील बिरोबाच्या बनात रविवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी व्यासपीठावर भाजपाचे खासदार संजय पाटील, आमदार सुमनताई पाटील उपस्थित होत्या.त्यावेळी व्यासपीठावरून बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकरांनावर निशाणा साधला.

आरेवाडीतील बिरोबा देवस्थान जागृत आहे. बिरोबाचा आशीर्वाद घेतल्यावर बऱ्याच चांगल्या गोष्टी होतात. मात्र, बिरोबाच्या बनात येऊन बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचे पार वाटोळ होते, असा टोमणा जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना मारला. जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना बिरोबा देवाच्या घेतलेल्या शपथेची आठवण करून दिली.

दरम्यान, जयंत पाटील यांनी दावा केला की, भाजपा सोडून स्वपक्षात जाण्याची इच्छा असलेले अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आहेत. या लोकांचे राष्ट्रवादीत स्वागत करण्यासाठी लवकरच त्या भागात दौरा काढू. विविध राजकीय पक्षातील नेत्यांचे भाजपामध्ये स्वागत केले जाते त्यांना त्या पक्षात ना कधी मान मिळतो ना भाजपाच्या कोअर समितीत प्रवेश. त्यामुळे असे अनके कार्यकर्ते ,नेते पुन्हा आपल्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा