असिस्टंटची नोकरी करणारा एका वर्षांत झाला सुपर स्टार; मिथून चक्रवर्तीच्या आयुष्याचा प्रवास

मुंबई : बॉलिवूड अभिनेता मिथून चक्रवर्ती यांचा आज वाढदिवस आहे. आज मिथून 71 वर्षांचे झाले आहेत. आपल्या अभिनयातून आणि नाचण्यातून चाहत्यांना भूल पडणारे मिथुन एकेकाळी अभिनेत्री हेलन यांचे असिस्टंट होते. बॉलीवूडमध्ये त्यांचे कसे पदार्पण झाले आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, जाणून घेऊया.

16 जून 1950 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या मिथून चक्रवर्ती यांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती आहे. चित्रपटात येण्यासाठी मिथून यांनी पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन संस्थेतून अभिनयाचा कोर्स पूर्ण केला आणि त्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. बर्‍याच संघर्षानंतर मिथून यांना हेलन यांच्या असिस्टंटची नोकरी मिळाली होती. त्यानंतर सहायक म्हणून काम करत असताना त्यांना अमिताभ बच्चन यांच्या ‘दो अनजाने’ या चित्रपटात काही मिनिटांचा रोल मिळाला होता.

आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी मिथुनला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर दोन वर्षांनी 1978 मध्ये आलेल्या ‘रक्षक’ या चित्रपटात त्यांनी काम केले. हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला होता. 1982 मध्ये आलेला ‘डिस्को डान्सर’ हा चित्रपट मिथून यांना मिळाला आणि त्यांच्या करिअरचा सुवर्णकाळ सुरु झाला. एका वर्षात 19 चित्रपटांत झळकून एकामागून एक हिट चित्रपट दिल्यानंतर मिथून चक्रवर्ती बॉलिवूडचे आघाडीचे अभिनेते बनले होते.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा