‘राज्यात फक्त लेडिज बारची छमछम ऐकू येते’; शेलारांची महाविकास आघाडीवर सडकून टीका

मुंबई : राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यापासून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र दिसतं आहे. पटोलेंच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत फुट पडली का? असे प्रश्न उपस्थित होत होते. यावरूनच आता पुन्हा एकदा भाजपनेते आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

“स्वबळावर लढणार, आम्ही स्वबळावर लढणार. एक म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार, अशी तिन्ही सरकारमध्ये रोज सकाळ संध्याकाळ एकच चर्चा असते. दुसरा म्हणतो त्यावर अग्रलेख लिहिणार, तर तिसरा म्हणतो दुसऱ्याला भेटायला जाणार, मग सगळे एकत्र भेटतात, अशी सगळी स्वबळाची छमछम राज्यात सुरू आहे. राज्यात बाकी काही ऐकू येत नाही. फक्त लेडिज बारची छमछम ऐकू येते,” अशी टीका शेलार यांनी केली.

“मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण, पाऊस, पूर, कोरोना, लॉकडाऊन,शेतकरी, बियाणे, खते, पिक वीमा, वीज, अडचणी आलेले अलुतेदार, बलुतेदार, व्यापारी असे राज्यासमोर अनेक प्रश्न पडले आहेत. मात्र, सगळे प्रश्न कोमात आणि सरकारमधील तीन पक्षांमध्ये स्वबळाची छमछम जोमात असं चित्र राज्यात आहे,” अशी टीका देखील आशिष शेलार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा