InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत आता ‘ही’ खास सुविधा

पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत बँकांमध्ये आतापर्यंत 35.99 कोटी खाती उघडण्यात आली आहेत. त्यातील 29.54 कोटी खाती अकार्यान्वित आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी एका प्रश्नाला राज्यसभेत लिखित उत्तर देताना ही माहिती दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात जनधन खाते असणाऱ्या महिलांना ओव्हर ड्राफ्टची सुविधा देणार असल्याचं सांगितलं होतं. ज्या महिला सेल्प हेल्प ग्रुपच्या सदस्य आहेत, त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

सुविधेमुळे महिलांना छोटे व्यवसाय करण्यासाठी मदत मिळणार आहे. ओव्हरड्राफ्ट म्हणजेच खात्यात शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सुविधा मिळणार आहे. या योजनेंतर्गत खातेधारकांना 10 हजार रुपयांची ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळत आहे. तत्पूर्वी या सुविधेंतर्गत 5 हजार रुपये काढता येत होते. जनधन योजनेंतर्गत खासगी बँकांमध्ये खाती उघडण्याचीही सरकारनं परवानगी दिलेली आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply