‘शेरशाह’चा ट्रेलर पाहून कारगिल युद्धामध्ये शहिद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आई-वडिलांची भावूक प्रतिक्रिया

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट ‘शेरशाह’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे कथानक कारगिल युद्धामध्ये शहिद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शौर्य गाथेवर आधारित आहे. या चित्रपटाच्या लॉंचच्या कार्यक्रमाला विक्रम यांचा भाऊ उपस्थित होता. काही कारणांमुळे त्यांचे आई-वडिल उपस्थित राहू शकले नव्हते. पण चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हा ट्रेलर ‘कारगिल दिवस’च्या एक दिवस आधी प्रदर्शित केला आहे. ‘शेरशाह’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देताना विक्रम बत्रा यांचे वडील म्हणाले, ”युद्धावर आधारित असलेले चित्रपट पाहून मला प्रचंड अभिमान वाटतो. आमच्या मुलाच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. त्याच्या बालपणापासून सुरू होणारा संघर्ष त्याचे आयएमए (इंडियन मिलिटरी अकादमी) पर्यंतचा प्रवास आणि शेवटी भारतीय सैन्यात दाखल होतो. हे सर्व या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे.”

पुढे ते म्हणाले, ”हा चित्रपट ‘कारगिल’ युद्धातील नायकांना खरी श्रद्धांजली आहे. शहीदांच्या स्मृतींच्या दस्तऐवजीकरणास बराच विलंब झाला. ते कारगिल युद्धानंतर दोन-चार वर्षांत बनले असते, तर योग्य ठरले असते. आम्हाला अजूनही अभिमान वाटतो की, दिग्दर्शकाने कारगिल युद्धातील आमच्या मुलाच्या जीवनावर आधारित जीवनपट बनवला आहे”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

तसेच शेरशाह’ हा चित्रपट 12 ऑगस्टला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. कारगिलच्या द्रास येथे या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा