InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Tiktok आणि Helo App बंदीची शक्यता; सरकारने पाठवली नोटीस

- Advertisement -

केंद्र सरकारने सोशल मीडियावर व्हिडीओंचा धुमाकूळ माजवणारं TikTok App चालवणाऱ्या कंपनीला नोटीस पाठवली आहे. यासोबतच हेलो App लाही नोटीस पाठवत दोन्ही कंपन्यांकडून 21 प्रश्नांची उत्तरं मागवण्यात आली आहेत. योग्य उत्तरं न मिळाल्यास भारतात दोन्ही App वर बंदी घातली जाऊ शकते. यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका संघटनेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून टिकटॉक आणि हेलोवर बंदी घालण्याची मागणी केली होती. हे दोन्ही Apps देशविरोधी कृत्यांचा अड्डा बनले असल्याचा दावा या मागणीद्वारे करण्यात आला होता.

स्वदेश जागरण मंचने मोदींना पत्र लिहिल्यानंतर माहिती व प्रसारण मंत्रालयाने App चालवणाऱ्या कंपन्यांना नोटीस जारी केली. भारतीय तरुण या App मुळे वेगळ्याच दिशेने जात असल्याचं स्वदेशी जागरण मंचने म्हटलं होतं. तर टिकटॉकने पुढच्या तीन वर्षात भारतामध्ये 100 कोटी डॉलर गुंतवणुकीचं लक्ष्य ठेवलंय, ज्याद्वारे पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानावर भर दिला जाईल.

- Advertisement -

दरम्यान, यापूर्वी एप्रिलमध्ये मद्रास हायकोर्टाच्या मदुरै खंडपीठाने केंद्र सरकारला टिकटॉक App ची डाऊनलोडिंग बंद करण्याचा आदेश दिला होता. शिवाय टिकटॉक व्हिडीओ फेसबुकला शेअर करण्याचा ऑप्शन बंद करण्यात यावा असंही म्हटलं होतं. मुलांना सायबर क्राईमपासून वाचवण्यासाठी सरकार काही कायदा आणणार आहे का, अशीही विचारणा कोर्टाने केली होती.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.