InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

उद्याच्या बैठकीत काँग्रेसचा उत्तराधिकारी निवडला जाण्याची शक्यता

राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षापदावरून राजीनामा दिल्यानंतर उद्याच्या बैठकीत त्यांचा उत्तराधिकारी निवडला जाण्याची शक्यता आहे. या पदावर मुकुल वासनिक यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सोमवारी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक असून त्यामध्ये कोण काँग्रेस अध्यक्ष करायचा यावर निर्णय होवू शकतो.

लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून राजीनामा दिला. तेव्हापासून काँग्रेसला सर्वात गंभीर नेतृत्व संकटाचा सामना करावा लागला आहे. नेतृत्व संकटाच्या दरम्यान काँग्रेसच्या जुन्या व वरिष्ठ नेत्यांनी यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांना तात्पुरते पद घेण्यास आवाहन केले, परंतु त्यांनी आरोग्यविषयक कारणे देऊन नकार दिला आहे. अनेक वरिष्ठ नेत्यांची नावे काळजीवाहू अध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत. यात मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खडगे, ज्योतिरादित्य सिंधिया आणि सुशील कुमार शिंदे यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply