InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मुख्यमंत्री दोन मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नवं राजकीय गणित मांडण्याच्या तयारीत आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री दोन मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री त्यांच्या नागपूर दक्षिण- पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेतच, शिवाय त्यांच्यासाठी मुंबईतील मतदारसंघाचीही चाचपणी सुरु आहे.  मुंबईतील मलबार हिल किंवा मुलुंड यापैकी एक मतदारसंघ मुख्यमंत्री निवडू शकतात. विदर्भाऐवजी महाराष्ट्राचा नेता अशी छबी निर्माण करण्याचा यावरुन प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होऊ शकतात. ऑक्टोबर महिन्यात विद्यमान सभागृहाचा कार्यकाल संपणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार हे निश्चित आहे. त्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री दोन मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.