InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

गोव्यात नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या होण्याची शक्यता

गोव्यात नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या होण्याची शक्यता आहे.  गोव्यात आज नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार होता. मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज देखील दिल्लीत असल्यामुळे शपथविधी पुढे ढकलण्यात आला आहे. कर्नाटकच्या राजकीय नाट्याचा अंक एकीकडे सुरु असताना गोव्यात काँग्रेसला खिंडार पडले. गोव्याचे काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये दाखल झालेत. आता या बंडखोर आमदारांचा शपथविधी कधी होणार याकडे लक्ष आहे.

दिल्लीमध्ये महत्वाच्या बैठका असल्याने मुख्यमंत्री सावंत आज रात्री किंवा उद्या गोव्यात परतणार आहेत. त्यामुळे उद्या संध्याकाळी शपथविधी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसचे दहा आमदार गळाला लागल्यामुळे भाजपने महाराष्ट्र गोमंतक पक्ष (मगोप), गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. त्यामुळे गोव्याच्या राजकारणात कमालीचे महत्त्व असलेल्या छोट्या पक्षांचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply