पंतप्रधानांनी केला बुद्धांच्या अष्टांग मार्गाचा विशेष उल्लेख

जग सध्या संकटातून जात असून भगवान बुद्धांनी दाखवलेला मार्गच यातून जगाला तारू शकतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं देशाला संबोधित केलं. यामध्ये मोदींनी बुद्धांच्या अष्टांग मार्गांचा विशेष उल्लेख केला. त्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात धम्म चक्र दिवसाच्या निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेकडून (आयबीसी) या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

खासगीकरणाच्या दिशेने भारतीय रेल्वेचा प्रवास वेगात !

आज संपूर्ण जग अतिशय अवघड परिस्थितीचा आणि आव्हानांचा सामना करत आहे. भगवान बुद्धांनी दिलेल्या शिकवणीत या आव्हानांवर मात करण्याची क्षमता आहे. बुद्धांचे विचार कालानुरूप आहेत. ते भूतकाळात तर अनुरूप ठरलेच. मात्र वर्तमानकाळ आणि भविष्यकाळासाठीदेखील ते सुसंगत आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सरकारवर कर्ज काढण्याची वेळ येईल

भगवान बुद्धांनी दाखवलेले अष्टांग मार्ग समाज आणि देशांच्या कल्याणासाठी उपयोगी आहेत. करूणा आणि दया यांचं महत्त्व बुद्धांची शिकवण अधोरेखित करते. विचार आणि क्रिया या दोन्हीमध्ये बुद्धांच्या शिकवणीमुळे अधिक स्पष्टता येते, असं प्रतिपादन मोदींनी केलं.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.