InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पुणे विद्यापीठाचे कुलगुरूंवर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल

- Advertisement -

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिफॅक्टरी या जेवणाच्या ठिकाणी जेवणाच्या नवीन नियमांबाबत विद्यार्थी आणि प्रशासनामध्ये गोंधळ झाला होता. दरम्यान, विद्यापीठाने या प्रकरणात आकाश भोसले यांच्यासह इतर ११ विद्यार्थ्यांवर ३५३ सारखे इतर गंभीर गुन्हे दाखल झाले होते.

आकाश भोसले हे पत्रकार असून ते तिथे सदर घटनाचे वृत्तांकन करत होते. वृत्तांकन करणे हे माझे कर्तव्य असून ते माझ्यावर हा गुन्हा दाखल करूच कसे शकतात, असा सवाल पत्रकार आकाश बोसले यांनी उपस्थित करून विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्यासह इतरांवर अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. हा गुन्हा अॅड. तोसिफ शेख आणि स्वप्नील गिरमे यांच्यामार्फत पुणे जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला आहे.

- Advertisement -

२८ मार्च २०१९ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने रिफेक्टरीच्या संदर्भात एक परिपत्रक काढले होते.जे परिपत्रक विद्यार्थ्यांच्या हिताचे नव्हते.याबाबत विद्यार्थी आक्रमक झाल्याचेही पत्रकार आकाश भोसले यांनी बातमी प्रसिद्ध करून सांगितले होते.याअगोदर आकाश भोसले यांनी विद्यापीठाच्या चुकीच्या धोरणांबाबत तसेच बोगस भरती आणि भ्रष्टाचाराबाबत अनेक बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत.त्यामध्ये सिनेट सदस्य कसा जातीयद्वेष करतात यांचाही उल्लेख आहे.

सदर परिपत्रकावरून १ एप्रिल २०१९ रोजी विद्यापीठातील रिफेक्टरीसमोर १५०-२०० विद्यार्थ्यांचा रि-फेक्टरीत जेवण करण्याच्या प्रवेशावरून गोंधळ निर्माण झाला.याठिकाणी विद्यापीठाचे सेक्युरिटी तसेच चतुशृंगी पोलीस स्टेशनचे पोलीसही उपस्थित राहून सदर गोंधळ पाहात होते.या संपूर्ण प्रकरणाचे लाईव्ह कव्हरेज मॅक्स महाराष्ट्र चॅनेल साठी आकाश भोसले करीत होते.त्याचे फुटेज सुद्धा उपलब्ध आहेत. दुसऱ्या दिवशी आकाश भोसले यांच्यासह इतर ११ विद्यार्थ्यांवर ३५३ सारखे इतर गंभीर गुन्हे दाखल झाले होते. पत्रकार म्हणून रिपोर्टिंग करण्यासाठी सदर ठिकाणी उपस्थित असताना हे गुन्हे दाखल झालेच कसे? हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत.

मात्र विद्यापीठाच्या विरोधात पुराव्यासह दिलेल्या बातम्यांमुळेच षडयंत्र रचून आपण अनुसूचित जाती जमातीमधून येत असल्याने हे गंभीर गुन्हे दाखल झाले असल्याचे पत्रकार आकाश भोसले यांनी चतुशृंगी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. तसेच एकूणच झालेल्या प्रकरणावर प्रथमच कोणा विद्यार्थ्याने कुलगुरूंवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला असावा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.