बाकीच्यांचं माहिती नाही, पण सरकारमध्ये फक्त अमित शाह खरं बोलतात; सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

मुंबई : राज्यातील महाविकस आघाडीच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या आहेत. त्यामध्ये कारवाई होऊन अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे मंत्री आता तुरुंगात आहेत. मात्र आज लोकसभेत बोलत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला.

तसेच सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, ईडी आणि सीबीआय यांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभारतोय. या संस्था जर स्वतंत्र असतील तर महाराष्ट्रातील कोणता नेता तुरुंगात जाणार हे भाजपच्या नेत्यांना आधीच कसं समजतं? भाजप नेते याबद्दल आधीच कसं ट्वीट करतात? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.

“हे सर्व ट्विटरवर येतं. मी याबाबत तारखेनुसार पुरावे सादर करू शकते. याचे दोनच अर्थ निघतात. तुम्ही एकतर मान्य करा की ईडी, सीबीआय या सर्व तपास संस्था सत्तेत असलेल्या लोकांकडून चालवल्या जातात. खरं बोला, अमित शाह खरं बोलतात. मला वाटतं मी फक्त त्यांनाच याबाबत विचारायला हवं. सरकारमध्ये इतर कोण खरं बोलतं याबाबत माहिती नाही. अमित शाह तर नक्की खरं बोलतात,” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपाला टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा