InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारे टाॅप ५ खेळाडू

आयपीएलने काही वर्षातच जगभरात आपली लोकप्रियता मिळवली आहे. आता तर जगभरातील श्रीमंत लीगमध्ये आयपीएलची गणना देखील होते. आयपीएलमुळे अनेक क्रिकेटपटूंना त्यांची क्षमता, कौशल्य दाखवण्यासाठी मोठे माध्यमही मिळाले.

त्याचबरोबर अनेक क्रिकेटपटू आयपीएलमुळे करोडपतीही झाले, मग ते क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले असो वा देशांतर्गत स्तरावर.

Loading...

यावर्षीच्या आयपीएल लिलावातही ही गोष्ट पहायला मिळाली. 7 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला जयदेव उनाडकटसाठी राजस्थान रॉयल्सने मागील वर्षी आणि यावर्षीच्या आयपीएल लिलावात एकूण 19.9 कोटी रुपये मोजले आहेत.

तसेच तमिळनाडूच्या वरुण चक्रवर्थीला यावर्षी किंग्स किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने 8.4 कोटींची बोली लावत संघात सामील करुन घेतले. त्याने आत्तापर्यंत फक्त 1 प्रथम श्रेणीचा सामना आणि 9 अ दर्जाचे सामने खेळले आहेत.

- Advertisement -

आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणारे हे आहेत टॉप खेळाडू-

5. सुरेश रैना – मिस्टर आयपीएल म्हणून ओळख असणाऱ्या सुरेश रैनाने प्रत्येक आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे. त्याचबरोबर त्याच्यानावावर अनेक विक्रमही आहेत. त्याने आयपीएलमधून 88.7 कोटींची कमाई केली आहे. त्याला चेन्नई सुपर किंग्सने मागीलवर्षी 11 कोटी रुपयांमध्ये कायम केले होते.

4. गौतम गंभीर – डिसेंबर 2018मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला गौतम गंभीर आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलमध्ये 94.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकता नाईट रायडर्सने आत्तापर्यंत 2 वेळा विजेतेपद मिळवले आहे. मागीलवर्षी गंभीर दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळला. दिल्लीने त्याच्यासाठी 2018 च्या आयपीएल लिलावात 2 कोटी रुपये मोजले होते. तसेच त्याला कर्णधारही केले होते. पण त्याने पहिल्या 6 सामन्यानंतर कर्णधारपद सो़डले.

3. विराट कोहली – सध्याचा सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असणारा विराट कोहली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 109.2 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कोहलीला मागील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने 17 कोटी रुपये मोजत संघात कायम केले होते.

तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.एक फलंदाज म्हणून जरी कोहलीने चांगली कामगिरी केली असली तरी त्याच्या नेतृत्त्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मात्र आत्तापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही.

2. रोहित शर्मा – मुंबई इंडियन्सला तीनवेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माने आयपीएलमधून 116.8 कोटींची कमाई केली आहे. त्याला मागीलवर्षी मुंबईने 15 कोटी रुपयांमध्ये कायम केले होते.

त्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबईने 2013, 2015, आणि 2017 असे तीन वेळा विजेतेपद मिळवले आहे. त्याचबरोबर रोहित हा आयपीएलमध्ये रैना आणि कोहलीनंतर सर्वाधिक धावा करण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

1 एमएस धोनी – आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार असणारा एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्स संघाची धूरा समर्थपणे पेलली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली प्रत्येक आयपीएल मोसमात चेन्नईने बाद फेरीत प्रवेश केला आहे.

धोनीला मागील वर्षी चेन्नईने 15 कोटी रुपयांमध्ये संघात कायम केले होते. त्याने आत्तापर्यंत आयपीएमध्ये 122.8 कोटींची कमाई केली आहे.

त्याच्या नेतृत्वाखाली मागीलवर्षी चेन्नईने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवले होते. याआधी त्याच्या नेतृत्वाखाली 2010 आणि 2011 असे दोनवर्षी आयपीएलचे विजेतेपद मिळवले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.